सध्या राज्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयुष्यभर जीव ओतून थाटलेले संसार अक्षरशः वाहून गेले आहेत. या पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
काल रात्री नागपूर जिल्ह्यामध्ये 100 हून अधिक म्हणजेच 106 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवघ्या 4 तासांमध्येच इतका पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखोल भागात पाणी शिरले आहे. तसेच नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान खात्याकडून नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आताही पाऊस सुरूच आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मात्र चांगली धांदल उडाली आहे. या मुसळधार पावसाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. त्याचवेळी “नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी,” अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
आता हवामान विभागाने पुढचे तीन ते चार तास काही जिल्ह्यांना मुसळधार पाऊस दोन जोडणार आहे, याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तर आता पुणे वेधशाळेने मुंबई, रायगड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे येथे पुढचे तीन ते चार तास मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाचा हा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
हे पण वाचा: विराट कोहलीने गायक शुभनीतला अनफॉलो केले; कारण म्हणजे…