मंदार आपटे:
खेड शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी आयोजित लहान गटांमध्ये लायन्स क्लबच्या गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यासाठी अकसा पोत्रीक आणि नाजीमा महाते यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच जैबा खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या नृत्य स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला. त्या सर्वांचे मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब साहेब, सर्व संस्थासदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, पालक व शिक्षणप्रेमी जनतेने अभिनंदन केले आहे.
हे देखील वाचा :