ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (सी.बी.एस.सी.) मोरवंडे- बोरजचा 10 वा वर्धापनदिन

खेड-मंदार आपटे :
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (सी.बी.एस.सी.) मोरवंडे- बोरज या प्रशालेस आज 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रशालेचे विभाग प्रमुख श्री. राजेश किट्टद व सौ. शर्वरी शिर्के यांनी प्रशालेच्या दहा वर्षाच्या कालावधीची प्रमुख वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडली.

प्रशालेच्या पहिल्या दिवसापासून प्रशालेत कार्यरत असणारे सहाय्यक शिक्षक श्री. प्रतीक पवार व सौ. जयश्री शिरसाट यांनी गेल्या दहा वर्षात त्यांना आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री. भरत मोरे यांनी प्रशालेसाठी लागणारी जागा घेण्यापासूनचे त्यांचे अनुभव आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . किरण दरेकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सौ . प्रियसी दळवी यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त माननीय श्री. पेराज जोयसर संस्थापक सदस्य माननीय श्री. भालचंद्र कांबळे, श्री. रूपल पाटणे प्राथमिक विभागाचे प्रशाला समिती चेअरमन माननीय श्री. प्रफुल्ल महाजन, माध्यमिक विभागाचे प्रशाला समिती चेअरमन मा. श्री. अनिल शिवदे, संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी मा. श्री. प्रकाश गुजराथी संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री. माधव पेठे, ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री. राजकुमार मगदूम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा मोरे, ज्ञानदीप महाविद्यालयाचे रजिस्टार श्री . सीतारामपंत जामकर , ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य श्री. ओंकार कुलकर्णी तसेच ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री. सुजित नगरे तसेच ज्ञानदीप विद्या संकुल मोरवंडे बोरज येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. भरत मोरे इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

हे देखील पहा : खेड नगरपालिका व भडगाव खोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील रस्ता बनला धोकादायक ! विद्यर्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास !

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!