खेड:- मंदार आपटे
संत निरंकारी मंडळाच्या वतीने रक्तदान,आरोग्य शिबीर, स्वछत्ता अभियान असे अनेक मानवता वादी कार्यक्रम आयोजित केले जातात,त्याचाच एक भाग म्हणून वृक्षरोपण व संगोपन हा ही पर्यावरणाला पूरक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
संत निरंकारी मंडळ शाखा खेड च्या वतीने दि. २१ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम खेड तालुक्यातील कळबणी येथील गावदेवी मंदीरात राबवण्यात आला. या मधे वेगवेगळ्या प्रकारची १०० झाडे लावण्यात आली.ज्या प्रमाणे अनेक जातीची झाडे एकत्र वाढतात,आनंदाने राहतात त्या प्रमाणे माणसाने सुध्दा एकत्वने रहावे हा ह्या वन नेस वन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे,असे तालुका मुखी बळिराम शिंदे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी निरंकारी अनुयायी व गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य महिपत पाटणे, माजी पंचायत सदस्य शांताराम म्हसकर,दत्ता येरापले,भारत आयरे,काशिराम सुतार उपस्थित होते. दीपक बुरटे, भगवान साळुंखे व बळिराम शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते.
हे देखील वाचा :