खेड शहरात मोकाट गाढव कुत्री यांची दहशत !

खेड मंदार आपटे:
खेड शहरात सध्या मुसळधार पाऊस आहे पावसापासून आपला बचाव करण्यासाठी उनाड गाढव आसरा शोधत असतात खेड शहरातील एका छोट्या व्यवसायिकाकडे चक्क गाढव पावसापासून बचाव करण्यासाठी या दुकानांमध्ये ठाण मांडून बसले होते.

या व्यापारी मित्राला आपल्या दुकानातून गाढव हाकलण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती यावेळी अनेकाने तीव्र नाराजी व्यक्त केली .स्थानिक संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

शहरांमध्ये ठिकठिकाणी कुत्रे मोठ्या प्रमाणावर असतात विद्यार्थी शाळेमध्ये जाताना नागरिक बाजारात येतात महिलावर्ग मोठ्या प्रमाणावरती दूचाकी चालवताना या सगळ्यांच्या अंगावर कुत्रे येतात आणि या त्यामुळे छोटे-मोठे अपघात बाजारपेठेत होतात त्या सगळ्याला नक्की जबाबदार कोण असा प्रश्न वाहन चालक विद्यार्थी विचारतात विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे या कुत्र्यांची व गाढवांची संबंधित प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू आहे.

खेड शहरात मोकाट गाढव कुत्री यांची दहशत !

खेड शहरात चौका चौकामध्ये ठीक ठिकाणी हे कुत्रे आपले ठाण मांडून बसलेले असतात आणि शेजारून दुचाकी गेली की कुत्रा त्यांची पाठलाग करतो गाढव रात्रभर व्यापाऱ्यांच्या समोरच्या पत्र्याच्या शेड खाली थांबलेले असतात व्यापाऱ्यांना या सगळ्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो तरी खेड शहरातून त्रस्त नागरिक प्रशासनला जाब विचारणार का???

संबंधित प्रशासन यावर ठोस उपाययोजना करणार का नाही!!
तर सत्ताधारी व विरोधक या प्रश्नाकडे मूग गिळून का गप्प आहेत हे समजत नाही? विरोधकांनी यावर आवाज उठवत नगरपालिकेला जाब विचारला पाहिजे अशी मागणी होत आहे.

हे देखील पहा 👇 :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!