खेड शहरात 13 लाख 84 हजार रुपयांची सोन्याच्या दागिन्याची चोरी !

खेड शहरात कौचाली पटेल मोहल्ला येथील घर फोडून झाली चोरी. 13 लाख 84 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले चोरून मध्यरात्री बंद घर फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरांमध्ये शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान शहरातील कौचाली पटेल मोहल्यात एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूम मधील कपाटातील तब्बल 13 लाख 84 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. 

या घटनेमुळे खेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याबाबत त्या घराच्या मालकाचे नातेवाईक वसीम कुतुबुद्दीन धेनकर यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यावर भादवी कलम 380, 454 आणि 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड शहरात लाखो रुपयांच्या चोरीने एकच खळबळ.

हे पण वाचा: खेड शहरात मोकाट गाढव कुत्री यांची दहशत !

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!