Weather Update: राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाचा इशारा! दीर्घ प्रतिक्षेनंतर ‘या’ जिल्ह्यांत पावसाची हजेरी

Weather Update: पावसाळा सुरू होऊन दोन ते तीन महिने लोटून गेले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांसह शेतकरी देखील चिंतेत पडले आहेत. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने यंदा दुष्काळ पडतो की काय? असे चित्र निर्माण झाले. परंतु अशातच हवामान विभागाने (Weather Update in Maharashtra) दिलासादायक अपडेट दिली आहे. काल गौरी आगमनादिवशी काही भागांत पावसाने हजेरी लावली.

पुढचे दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस
हवामान विभागाने पुढचे दोन दिवस राज्यामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याच अंदाजानुसार कोकण आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने (Weather Forecast) दिला आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे 22 आणि 23 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे.

23 ते 26 सप्टेंबर कसे असेल हवामान?
त्याचबरोबर दिनांक 23 ते 26 सप्टेंबर पर्यंत राज्यात संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरीत इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अहवाल हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाची हजेरी
राज्यांमधील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. वर्ध्यात देखील जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस पडला.

पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः वाया जाण्याच्या मार्गावर होती. पावसामुळे या पिकांना जीवनदान मिळाले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा: Flipkart big billion days sale 2023: या तारखे पासून सुरु होणार फ्लिपकार्ट बिग बिल्यन सेल

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!