शाहरुख खानचा जवान बॉक्स ऑफिसवर सुसाट! जगभरात तब्बल 1 हजार कोटींची कमाई

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. हा चित्रपट 20 व्या दिवशीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, त्याने आज 7 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शनिवारी 12 कोटी 25 लाखांची कमाई केली होती. रविवारी 14 कोटी 95 लाखांची कमाई केली. तर सोमवारी या चित्रपटाने 5 कोटी 30 लाखांची कमाई केली.

आता हा चित्रपट आज म्हणजेच मंगळवारी 7 कोटींच्या आसपास कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. जवान चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये 390 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने 136 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाला 40 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आले आहे. अजून देखील चाहत्यांमध्ये जवानची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे.

चित्रपटगृहामध्ये शाहरुख खानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शन अ‍ॅटली कुमार यांनी केले आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, एजाज खान, सुनील ग्रोवर, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक स्टार्सनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संजय दत्त आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटात खास कॅमिओ केला आहे.

जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर 600 कोटींच्या टप्पा पार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हा चित्रपट जगभरात धुमाकूळ घालत आहे. ‘जवान’ चित्रपटाचे चौथ्या आठवड्यातही प्रदर्शन सुरू राहणार आहे. चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा: नादचखुळा! गौतमी पाटील झळकणार मोठ्या पडद्यावर; ‘घुंगरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नवी अपडेट समोर

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!