शाळेकडे जाणार रस्ता सुधारा नाहीतर २६ जानेवारी रोजी साखळी उपोषण बसणार पालकाचे निवेदन

ज्ञानदीप शाळेकडे जाणारा रस्ता सुधारला नाही तर २६ जानेवारी रोजी पालक विद्यार्थ्यांना घेवून साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन देण्यात आले यावेळी संतप्त पालक नगरपालिका कार्यालयात येवून धडकले.

यावेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजय कदम,खेड नगरपरिषद मा.नगरसेवक श्री.अजय माने तानाजी सावंत मंदार आपटे अभिजित पाटणकर अभजित चिखल प्रसाद पाटणे भक्ती काळे अनुक्षका सोमण श्रावणी बदिवडेकर पिंट्या जोशी आनंद सोमण लायन्स चे विचारे उपस्थित होते.

ज्ञानदीप शाळेकडे जाणारा रस्ता अत्यंत दुरावस्था झाली असून गेली २५ वर्ष जागोजागी खड्ड्यांचा साम्राज्य झाले आहे. गेले अनेक वेळा तोंडी सूचना देऊन खेड नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने २६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना घेऊन सर्व पालक उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन आज खेड नगरपालिकेला देण्यात आले ही बातमी दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा आमदार संजयराव कदम यांना समजताच तेही या पालकांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या वेळेला अनेक पालक विद्यार्थ्यांना घेऊन उपस्थित होते.

प्रत्यक्ष प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तिथे बोलवून याबाबत जाब विचारण्यात आला मात्र प्रशासनाकडे कोणत्याही पद्धतीने पालकांचे समाधान होईल असे उत्तर न मिळाल्याने काही पालक नाराज झाले मात्र माजी आमदार संजय कदम यांनी व पालकानी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला त्यानंतर प्रशासन ताबडतोब खड्डे भरण्यात येतील असे तोंडी आश्वासन देवून ठेकेदारास खड्डे भरण्यास सांगितले.

अधिक वाचा : खेडमध्ये ३ हजाराची लाच स्वीकारणारा महसूल सहाय्यक कर्मचारी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!