Diwali Gold Shopping Fraud Alert | दिवाळी 2024 मध्ये सोनं खरेदी करताय? सावध रहा, फसवणुकीचे नवे फंडे उघडकीस!

Diwali Gold Shopping Fraud Alert : यंदा दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे आणि लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला होणार आहे. दिवाळीच्या या खास दिवशी घरात नवीन काहीतरी खरेदी करणे शुभ मानले जाते – जसे की भांडी, झाडू, सोने, चांदी इत्यादी. हा रिवाज प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. दरवर्षी आपण दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करतोच, पण या डिजिटल युगात हा व्यवहार तितका सोपा राहिलेला नाही. सोने-चांदी खरेदी करताना लहान चुकांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे ते जाणून घेऊया…

Diwali Gold Shopping Fraud Alert | सोने खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी

1. ऑनलाइन सोने खरेदी टाळा

सध्या फ्लिपकार्ट, ऍमेझॉन सारख्या ई-कॉमर्स साईट्सवरून वस्तू खरेदी करणे सामान्य झाले आहे. परंतु सोने-चांदी ही ऑनलाइन खरेदी करण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे शक्यतो ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष दुकानातूनच सोने खरेदी करा. बाजारात काही मोबाईल ॲप्स आहेत जी सोने खरेदीसाठी विविध ऑफर्स व मोठ्या डिस्काउंटचे आमिष दाखवतात, पण ताज्या सर्वेक्षणानुसार त्यातील 90% ॲप्स हे फसवणुकीचे आहेत. म्हणूनच सोने-चांदी नेहमी प्रत्यक्ष दुकानातूनच खरेदी करावे.

2. अनोळखी ईमेल किंवा संदेश उघडू नका

दिवाळीच्या वेळी सर्वजण खरेदी करतात, याचा फायदा घेत अनेक फसवणूक करणारे अनोळखी ईमेल किंवा एसएमएसद्वारे तुमच्याकडे पोहोचतात. अशा संदेशांतील लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होण्याची किंवा फोन हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी ईमेल किंवा एसएमएस उघडणे किंवा त्यास प्रतिसाद देणे टाळा.

3. हॉलमार्क चेक केल्याशिवाय सोने खरेदी करू नका

दुकानात प्रत्यक्ष सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का ते तपासणे आवश्यक आहे. हॉलमार्क नसलेले सोने नकली किंवा कमी दर्जाचे असू शकते. त्यामुळे नेहमी हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करा.

4. बिल घ्यायला विसरू नका

दिवाळीच्या काळात सोन्या-चांदीच्या दुकानात मोठी गर्दी असते, पण गर्दीतून वेळ वाचवण्यासाठी किंवा नंतर बिल घेऊ असे म्हणणे टाळा. कारण पुढे सोने विकताना बिना बिलाशिवाय त्याची किंमत कमी मिळते. त्यामुळे सोने-चांदी खरेदी केल्यानंतर बिल नक्कीच घ्या.

अधिक वाचा: Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त! आजचा सोन्याचा ताजा भाव इथे पहा

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!