Majhi Ladki Bahin Yojana Latest News | डिसेंबरमध्ये येणार लाडकी बहीण योजनेचा हफ्ता! जाणून घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली मोठी घोषणा

Majhi Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबर या महिन्यांचे हफ्ते जमा करण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याचा हफ्ता पुढच्या महिन्यात दिला जाईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरचा हफ्ता डिसेंबरपूर्वीच मिळेल असे स्पष्ट केले आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने या योजनेचा निधी थांबवण्यात आला आहे. त्यामुळेच ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्यात आले. आता डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी मिळेल यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत महिलांना या संदर्भात आश्वासन दिले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Latest News

जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, आणि पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचे एकूण 7500 रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत. निवडणुकांमुळे आता निधी थांबवण्यात आला आहे, त्यामुळे योजनेचे पुढचे हफ्ते कधी मिळतील याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच ऑक्टोबरमध्ये देण्यात आले आहेत. त्यानंतर डिसेंबरचा हफ्ता नोव्हेंबरमध्येच जमा केला जाईल. “आमची नियत स्वच्छ आहे; आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा: Bandhkam Kamgar Scholarship Yojana: कामगार शिष्यवृत्ती योजनेतून मिळवा पैसे! पहिलीतून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संधी

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!