लाडक्या बहिणींना दिवाळीत खास भेट! अजित पवारांची मोठी घोषणा Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत नव्या योजनांचा वर्षाव!

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही मध्य प्रदेशातील लाडली बहन योजनेच्या आधारावर 1 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने या योजनेच्या लाभार्थींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष भेट दिली असून, योजनेत आतापर्यंत 2.34 कोटी महिलांना फायदा मिळाला आहे.

सध्या राज्यात निवडणुकीच्या हालचालींमुळे माझी लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा जोरात आहेत. पक्ष आणि विरोधी पक्षातील नेते या योजनेवर सतत बोलत असून यामुळे या विषयाची अधिकच चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, पुण्यात सांगवी येथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Majhi Ladki Bahin Yojana

ते म्हणाले की, “माझी लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही पुढील पाच वर्षांसाठी निधीची तरतूद केली आहे. ही योजना सुरूच राहणार आहे, विरोधी पक्ष लाभार्थी महिलांना चुकीची माहिती देत आहेत.” अजित पवार यांनी सांगितले की, आतापर्यंत या योजनेत 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळाला आहे.

त्यांनी पुढे उदाहरण देताना सांगितले की, “जेव्हा पोस्टमन मनीऑर्डर घेऊन येतो तेव्हा त्याला टीप मिळावी अशी अपेक्षा असते, पण माझी लाडकी बहीण योजनेत आम्ही कोणताही मध्यस्थ ठेवलेला नाही. आम्ही थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करत आहोत. पुढील पाच वर्षांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.”

या योजनेत पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. हे योजनेच्या ऑक्टोबरच्या चौथ्या आणि नोव्हेंबरच्या पाचव्या हप्त्याचे ऍडव्हान्स पेमेंट आहे.

अधिक वाचा: USFB Transgender Scholarship: ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मिळणार ₹60,000 पर्यंतची मदत, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!