दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मध्ये दोन बस समोरासमोर धडकून काही प्रवासी जखमी झाले तरी यामध्ये बस चालक गंभीर जखमी असून सर्वच जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
आज सकाळी आठ वाजता सुमारास दापोली शहरांमधील एसटी स्टँड पासून अगदी जवळच असलेल्या मोजदापोली ते खोंडा परिसरामध्ये दोन एसटी बसची धडक झाल्याचा समोर आलय. ही धडक समोरासमोर झाल्याचा पाहायला मिळतंय आणि ह्या अपघातामध्ये एकूण २५ जण हे जखमी झालेली आहे.
दापोली आगारामधून सकाळी दापोली जाणारी बस आणि बोरवली कडून दापोलीकडे येणारी बस अशा या दोन बस समोरासमोर धडक झाले. त्याचबरोबरची माहिती आलेली आहे त्यामध्ये गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत हँडल लॉक झालेला आहे आणि चालकाचे नियंत्रण गाडीवरून सुटलाचा समोर येते आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचं पाहायला मिळते एकूण ह्या अपघातामध्ये २५ जण जखमी झालेले आहेत.
त्यात जखमींमध्ये गाडीचे दोन चालक त्यांच्यासोबत प्रवास करणारे काही विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी, त्याचबरोबर कामानिमित्त किंवा बाजारासाठी गावाकडून दापोलीकडे येणारे आणि मुंबई कडून दापोलीकडे येणारे काही प्रवासी यांचा समावेश आहे. ह्या संपूर्ण प्रवाशांवर आता उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काही प्रवासी जे किरकोळ जखमी झाले होते ते मात्र आपल्या घरी गेलेले आहेत. जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान मात्र झालेला आहे. एकूणच या संपूर्ण गोष्टीचा तपास चालू आहे आणि उपचार देखील आरोग्यांवरती सुरू आहे.
हे देखील पहा :