खेडमध्ये झेरॉक्सचे दर वाढले | Xerox rates increased Khed

खेड-प्रतिनिधी-(मंदार आपटे):
खेड शहर झेरॉक्स संघटनेच्या वतीने आज नुकतीच खेड तालुक्यातील झेरॉक्स दुकानदार यांनी एकत्रित येऊन झेरॉक्स संघटनेच्या माध्यमातून नवीन दरपत्रक तयार करण्यात आले कारण वाढलेले पेपर दर, दुकान भाडे, कामगार मानधन,मशीन दुरुस्ती, मशनरी पार्ट, वाढते लाईट बिल, शाई, यासर्व वाढत्या गोष्टी चा विचार करून यावेळी ए- 4 कागदची एक बाजू तीन रुपये तर ए 4 कागदाच्या दोन्ही बाजू 5 रुपये लिगल साइज एक बाजू 4 रुपये ते लीगल कागदाच्या दोन्ही बाजू 6 रुपये ए 3 एक बाजू 6 रुपये ए 3 च्या दोन्ही बाजू 10 रुपये तसेच आधार कार्ड, लायसेन्स,पॅन कार्ड रेशन कार्ड या दोन्ही बाजूचे 5 रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच लेझर पेपर 5 रुपये पाठपोट 8 रुपये व शंभर जी .एस .एम .चा ए 4 साईज 5 रुपये पाठपोट 8 रुपये असे नवीन दर पत्रक सर्वानुमते तयार करण्यात आले आणि लॅमिनेशनचेही दरवाढ करण्यात आली यावेळी ए 4 लॅमिनेशन 25 रुपये आधार कार्ड साईज लॅमिनेशन 15 रुपये तर लीगल साईज 30 रुपये करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने हे नवीन दर पत्रक प्रसिद्धी करण्यात आले यावेळी शहरातील व तालुक्यातील अनेक व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी ओम स्टेशनरी भरणे, खेडचे जलाल मोहीमतुले, मामा गायकवाड, मंदार आपटे मुतालीफ घरटे ,दादा जगताप , परेश पाटणे ,ओंकार नारकर ,सिद्धेश बांदिवडेकर, मासूम मणियार, दुर्वास बेंडखळे ,शमीम हजवानी, जितेंद्र उपनेकर , संजय बुटाला ,वैशाली मुद्राळे , संगीता सावरकर, सविता महाजन, शितल चिखले ,नासिर शेख, सुदर्शन भालेकर, सोनिया कदम ,तन्वी जोशी यांसह अनेक व्यावसायिक उपस्थित होते या संघटनेची बैठक हॉटेल सौरभ ब्राह्मणआळी येथे उत्साहात पार पडली .तसेच तालुक्यातील इतर व्यवसायिकांनी अधिक माहितीसाठी दादा गायकवाड, जलालभाई मोहिमतुले, मंदार आपटे , दादा जगताप ,परेश पाटणे ,मुतलीफ घरटे याच्या जवळ संपर्क साधावा असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!