मंदार आपटे -खेड
खेड नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२-२३ अंतर्गत “ईको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा” आयोजित केली होती दिनांक: १४/९/२०२२ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करणेत आला.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
१) अभय मंगेश पाटणे. प्रथम क्रमांक ( टाकाऊ पुटटा,व सुतळी पासून तयार करणेत आलेला मखर)
२) विजय आत्माराम पाटणे. द्वितीय क्रमांक ( पुट्यापासुन तयार करणेत आलेला शनिवारवाडा)
३) दिलीप प्रभाकर कारेकर. तृतीय क्रमांक (कापडी वस्तू, पुटटा व नैसर्गिक फुले वापरून करणेत आलेली सजावट) असे 3 क्रमांक आले असून या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धेकांचे खेड नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय
अधिकारी सौ.राजेश्री मोरे व खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.प्रमोद ढोरजकर यांनी पारितोषिक व सन्मान चिन्ह देवून अभिनंदन केले. यावेळी न.प.चे कर्मचारी श्री शिरगावकर साहेब श्री राठोड सर,आदी उपस्थित होते. या सर्व विजेतांचे खेड शहरातून अभिनंदन होत आहे.
हे देखील पहा :
प्रथम 3 क्रमांकाचे देखाव्यांचे फोटो पाहायला मिळाले असते तर छान झाल असतं