खेड (मंदार आपटे):
जि प आदर्श शाळा भरणे नंबर 1मध्ये आज सोमवार 19रोजी लायन्स क्लब खेड स्टार कडून 200 मुलांना मिष्टान्न देण्यात आले .तसेच मुलांना आपल्या दातांची काळजी कशी घ्यायची त्या साठी डॉ सबा मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच शाळेतील 5 शिक्षक यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी दक्षता शिंदे मॅडम, सुमन सावंत मॅडम भारती बोडके मॅडम शशिकला हेळगवकर महेश शेडगे सर या सर्व शिक्षकाचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी तिथे लायन्स क्लब अध्यक्ष ला संपदा गुजराथी, सचिव ला प्रीती दरेकर, कॅबिनेट ऑफिसर ला विनया चिखल, उमा गुजराथी श्वेता चिखले, दीपा पाटणे, दीप्ती तोडकरी उपस्थित होते या उक्रमाबद्दल खेड शहरातून आनंद व्यक्त होत आहे.
हे देखील पहा :