खेड (मंदार आपटे) :
खेड लायन्स क्लब स्टार च्या वतीने शिवतेज आरोग्य सेवा संस्था येथील भव्य साडी प्रदर्शनाला खेड तालुक्यातील नव्हे तर दापोली गुहागर चिपळूण येथील ही महिला या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे लायन्स क्लब स्टार खेडच्या अध्यक्षा संपदा गुजराती यांनी बोलताना सांगितले त्यापुढे म्हणाल्या की महिलांना साडी खरेदी हा अत्यंत आवडीचा विषय असल्याने आम्ही खेडमध्ये त्याचे प्रदर्शन व विक्री करत आहोत तरी दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व लायन्स स्टार महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या प्रदर्शनाला विशेष प्रमुख अतिथी म्हणून आमदार योगेश दादा कदम व खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच रत्नागिरी लायन्स क्लब चे अध्यक्ष सौ श्रेया केळकर लोकसंचालक साधना केंद्राच्या सौ दीप्ती सावंत, यासह उमेश चव्हाण आशिष मेहता, वीरेंद्र चिखले यासह अनेक पदाधिकारी उत्तम असे सहकार्य करत आहेत. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संपदा गुजराती, विनया चिखले प्रीती दांडेकर स्नेहल गांधी, शबाना मुसा, तेजश्री कानडे उमा गुजराती, सबा चौधरी आदी पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
हे देखील पहा :