खेड (मंदार आपटे): खेड येथे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने जागतिक अंध दिनानिमित्त घराडी येथील अंध विद्यालयातील विद्यार्थी यांच्या वतीने खेड शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..यावेळी माजी आमदार संजयराव कदम, माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर माजी नगराध्यक्ष नागेशजी तोडकरी माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी माजी नगराध्यक्ष विजय उर्फ बाबूशेट चिखले लायन अध्यक्ष डॉ.
विक्रांत पाटील श्री संभाजी देवकाते सर दिव्यांग स्नेही वैजेश सागवेकर यांनी समानुभुती यावी म्हणून अंधांच्या भावविश्वाशी निकटचे नाते जोडता यावे म्हणून स्वतः डोळ्यावर पट्टी बांधूनच श्रीफळ वाढवला व या कार्यक्रमाचा शुभारंभ केला..इतकेच नव्हे तर संपूर्ण फेरी त्यांनी तशीच डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण केली.. हा आजच्या दिवसातील व आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता..इतके सोपे नाही या अंधारात मिसळणे या उक्तीला छेद दिला…
खरेच या मान्यवराना मानाचा मुजरा!
खेड हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथून फेरी निघून तळ्याचे वाकन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाजारपेठेतून ही फेरी निघाली यावेळी जिते जिते रक्तदान,जाता जाता नेत्रदान! दया नको भीक नको ,न्याय द्या संधी द्या!, पांढरी काठी दिनाचा विजय असो !पांढरी काठी अंधांसाठी!जिद्द घेतली मनावर ,आम्ही आमच्या पायावर! अशा घोषणा देत पुन्हा हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात विसर्जित झाली त्यानंतर दृष्टी नावाचे पथनाट्य सादर झाले. लायन मिलिंद तलाठी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांच्यातर्फे मिष्टान्न भोजन दिले..
या रॅलीमध्ये शहरातील अनेक शाळांनी भाग घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल हायस्कूल, एस एम हायस्कूल ,अल्मदिना स्कूल, समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान वेरळ स्कूल, इत्यादी संस्थांनी तसेच अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला डॉक्टर अंकुश यादव श्री.राजेंद्र खेडेकर अंकुशजी विचारे,पंकज शाह,आणि सर्व सन्मानीय लायन्स क्लबचे सदस्य पदाधिकारी यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.याबद्दल अध्यक्ष व लायन्स कलब खेड सर्वांचे ऋणी आहोत. लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी सुंदर व खूप छान नियोजन केले होते.
हे देखील पहा :