खेड तालुका कुमार, कुमारी, किशोर, किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी कब्बड्डी स्पर्धा संपन्न

(खेड-मंदार आपटे) : खेड तालुका कब्बड्डी असोसिएशन व टायटनचा राजा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका कुमार /कुमारी, किशोर / किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ रविवार दि.१३/११/२२ रोजी आंबेडकर हॉल, शिवतर रोड, खेड येथील मैदानावर संपन्न झाली.

सदर स्पर्धेत किशोर गटात महालक्ष्मी क्रीडा मंडळ चाकाळे यांनी प्रथम तर अनसपुरे संघाने द्वितीय क्रमांक पटकाविले. तर कुमार गटात श्रीकृष्ण क्रीडा मंडळ भडगाव संघ विजेता तर उपविजेता भैरवनाथ क्रीडा मंडळ चिंचघर हे संघ ठरले या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, उपाध्यक्ष श्री महेशराव भोसले, सचिव श्री. रविंद्र बैकर, कोषाध्यक्ष श्री दाजी राजगुरू, सहसचिव श्री.शरद भोसले, सल्लागार श्री. दादा बैकर, श्री दिलीप कारेकर कार्यकारणी सदस्य श्री. दिपक यादव, श्री.सुभाष आंबेडकर निमंत्रित सदस्य श्री.राकेश खेडेकर, श्री. तुषार सापटे, श्री स्वप्नील सैतवडेकर, यांचेसह टायटन कला क्रीडा मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष श्री. अमोल दळवी, उपाध्यक्ष आशिष रेपाळ, सदस्य अमर देवळेकर, श्री.प्रशांत कांबळे व मंडळाचे अन्य पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

खेड तालुका कब्बड्डी स्पर्धा संपन्न

या स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य म्हणून श्री.समीर शिंदे, श्री.विशाल खेडेकर, सौ.संपदा गुजराथी, श्री.संकेत रजपूत यांनी तर छाननी समिती सदस्य म्हणून श्री.सुरज जाधव,श्री.उल्हास शेलार यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी निरीक्षक श्री. अमोल दळवी तर पंचप्रमुख म्हणून श्री.संतोष शिर्के सर व पंच म्हणून श्री. राजेंद्र चांदीवडे, श्री.उल्हास शेलार, श्री. संजय जाधव, श्री.पुरुषोत्तम पाटील, श्री. सिद्धाराम चटलोड, श्री.परेश खोपडे, श्री. शशिकांत भुवड, श्री.दिनेश पदुमले,श्री.स्वप्नील बैकर, श्री.गणेश सानप, श्री.अमर चव्हाण, श्री.श्रीराम गीते, श्री. ऋतुराज चांदिवडे, श्री. दिनेश पवार, श्री. संदीप कालेकर, श्री. अजय निगडेकर यांनी काम पाहिले. आंबवली उपसरपंच श्री.विजयराव यादव, श्री.पांडुरंग विटमल, श्री.सुजित फागे, श्री.रुपेश तरडे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या टायटनचा राजा कला क्रीडा मंडळाला असोसिएशनच्या वतीने धन्यवाद देत व निवड झालेल्या किशोर,किशोरी कुमार, कुमारी संघातील खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहभागी संघांना, खेळाडूंना, कबड्डी प्रेमींना विशेष धन्यवाद देत सदर स्पर्धेची सांगता करण्यात आली. स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद भोसले यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दाजी राजगुरू सर यांनी केले.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!