खेड(प्रतिनिधी) मंदार आपटे:
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय लाचलुचपत प्रतिबंधक समितीच्या राज्य सचिव पदी खेड येथील सैफ चौगुले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सैफ चौगुले हे उच्च शिक्षित युवा तरुण असून बी. एस्सी संगणक, सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच विधी महाविद्यालयात ते सध्या शिक्षण घेत असून त्यांनी केलेल्या विविध विषयांवर काम करून जन माणसात आपला ठसा उमटवला आहे यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या देशाच्या आर्थिक , राजकीय , सामाजिक प्रगती मध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडसर असून त्याच्या निर्मूलना साठी सरकार आणि खासगी क्षेत्र या मध्ये नागरिकांनी संघटीत पणे भ्रष्टाचार विरोधात लढा देण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले त्यांच्या या निवडी बद्दल परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
हे देखील पहा :