(मंदार आपटे खेड)- पालक हे मुलाचे पहिले गुरु तर गुरु हे मुलाचे दुसरे पालक असतात. याचं मूर्तीमंत उदाहरण ज्येष्ठ शिक्षिका सौ.पराडकर मॅडम. किंवा मुलांना ज्या नावाने त्या अधिक परिचित आहेत ते म्हणजे सौ. बर्वे मॅडम. या नुकत्याच ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवार दि.३१ मार्च २०२३ रोजी त्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.
सन १९८५ सालापासून आपल्या विश्वनाथ विद्यालय लवेल या प्रशालेमध्ये त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ‘या शिक्षक संघटनेच्या 2017चा गुणवंत शिक्षक पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. आत्ताच्या स्टाफ मध्ये असणारे मुख्याध्यापक .श्री कदम सर तसेच ज्येष्ठ सहकारी श्री. चांदिवडे सर हे त्यांचे विद्यार्थी. असे असंख्य विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाने संस्कारीत होऊन विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेले आहेत.
या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मॅडमना आणि सर्व विद्यार्थ्यांना मॅडमचा सार्थ अभिमान आहे. जेव्हा कांहीं कारणानिमित्त माजी विद्यार्थी शाळेमध्ये येतात तेव्हा ते मॅडमची खूप आपुलकीने चौकशी करतात यावरून हे निदर्शनास येते.आणि हिच त्याच्या कामाची पोचपावती वेळोवेळी शाळेतील कार्यभाराच्या गरजेनुसार मॅडमनी कोणताही विषय शिकवण्यास वर्ज्य मानला नाही.
भाषा विषयावर त्यांचे थोडे अधिक प्रेम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला लेखन ,वाचन कौशल्य आत्मसात झाले पाहिजे यावर त्यांचा भर असे. सौ. पराडकर मॅडम चा वर्ग म्हटलं की त्या वर्गातून वेगवेगळ्या प्रार्थना, कविता, भक्ती गीते अशा वेगवेगळ्या गाण्यांचा आवाज नेहमी येतो. मॅडम आपल्या सुरेल स्वरात चाल सांगत आणि विद्यार्थी अतिशय उत्साहाने ती चाल अनुकरण करत असत. मुलींचा गणवेश ,पोशाख ,शिस्त याबाबत त्याचे अतिशय काटेकोरपणे लक्ष असे.त्या मुलींना सूचना देत, पण त्याही त्यांच्या मृदू आवाजात.
नवरात्र उत्सवाच्या दरम्यान शाळेत भोंडला मांडून भोंडल्याचे खेळ दरवर्षी खेळलेवले जात त्यामध्ये म्हटली जाणारी भोंडल्याची गाणी त्या अतिशय उत्साहाने गात आणि स्वतः मुलींबरोबर व सहकारी शिक्षिकांबरोबर फेर धरत. कोणताही कार्यक्रम असो प्रसंगाला अनुरूप अशा प्रकारचे एखादे गीत त्या अतिशय उत्स्फूर्तपणे सादर करीत.
शाळेतील विद्यार्थ्यांची कौटुंबिक माहिती त्यांना असते .कारण त्यांच्याच माजी विद्यार्थ्यांची मुले- मुली आता त्यांचे विद्यार्थी म्हणून शाळेत असतात. आपल्या शाळेला लाभलेल्या सर्व सन्माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले. दिलेले कोणतेही काम अतिशय प्रामाणिकपणे करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्याचप्रमाणे सहकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ,त्यांच्या मुला-मुलींच्या प्रगतीची अतिशय आस्थेने त्या चौकशी करत आणि त्यांच्या भविष्यातील उत्तम प्रगतीसाठी शुभचिंतन ही करीत.
अशा या प्रशालेतील विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ.पराडकर मॅडम.त्यांना सेवानिवृत्ती मुळे त्याच्या वर सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्या वर्षाव होत आहे.
हे देखील पहा 👇👇 :