आय.सी.एस. महाविद्यालयात चैतन्य वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

(मंदार आपटे): खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक मा.श्री.ना.बा.शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.मंगेशभाई बुटाला, संचालक मा.श्री.अमोलभाई बुटाला, सौ.सजेलीताई बुटाला, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एच.पी.थोरात, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनाचे विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचा ‘चैतन्य’ वार्षिक अंक प्रकाशित करण्यात आला. संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चैतन्य वार्षिक अंकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.ना.वा.शेलार यांनी वार्षिक अंकातील लेख लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच हा अंक संपादित करणाऱ्या संपादन मंडळाचे अभिनंदन केले.

यातील लेख हे नक्कीच प्रेरणादायी ठरतील, अत्यंत वाचनीय अशा प्रकारचा हा अंक सर्वांना नक्कीच आवडेल. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला यांनी मार्गदर्शन करताना चैतन्य वार्षिक अंका मधील ठळक वैशिष्ट्यांचा उल्लेख करत हा अंक खूपच उत्तम झाला असल्याचे नमूद केले आणि ज्यांनी ज्यांनी हा अंक सुंदर बनविण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एच.पी.थोरात यांनीही या प्रकाशन सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. चैतन्य वार्षिक अंकाचे संपादन डॉ.संजय पाटोळे, प्रो.डॉ.विद्या शिंदे, डॉ.राजेश राजम, डॉ.श्याम भगत, प्रा.दास दळवी यांनी केले. या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा.एम.के.केळकर यांनी केले.

हे देखील पहा 👉👉 : खाड्डी पट्यात वाळू सम्राटाचि मुजोर गिरी ! चक्क प्रामाणिक अधिक्यालाच दमदाटी !

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!