Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस 5 जूनपासून धावणार आहे. या गाडीला खेड साठी थांबा मंजूर झाला आह. या मंजुरी साठी विविध संघटनांनी मागणी केली होती.
अनेक एक्स्प्रेस गाड्या खेड स्थानकावर थांबत नाही त्यामुले अनेक प्रवाश्यांना गैरसोय होते. काही प्रवाश्यांना चिपळूण किंवा माणगाव स्थानकावर जावे लागते. खेड स्थानकावर फक्त खेड नाहीतर दापोली आणि मंडणगड तालुक्याचे प्रवासी देखील येतात.
वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 5:35 AM ला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. त्यानंतर ठाणे येथे 6:05 AM, पनवेल ला 6:40 AM, खेड ला 8:40 AM, रत्नागिरी ला 10:00 AM, मडगाव ला दुपारी 1:25 PM अशा वेळ असेल.
मडगाव येथून या गाडीचा वेळ दुपारी 2:35 PM ला असेल. त्यानंतर रत्नागिरी 5:35 PM, खेड 7 PM, CSMT ला रात्री 10:35 PM ला पोचणार आहे.
हे देखील पहा : बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ ए.आर.डी खतीब सरांना डॉ.महमद शफी पुरस्कार प्रदान