मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि UIDAI ने 11 ऑक्टोबर रोजी एक प्रेस रिलीज जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या 10 वर्षांमध्ये, व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधारचा वापर केला जात आहे. वेगवेगळ्या सेवांचा लाभ घेण्यासाठीही आधार क्रमांकाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, तुमचा आधार नेहमी अपडेट केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये.
अशा परिस्थितीत ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार काढला आणि त्यानंतर या वर्षांत एकदाही आधार अपडेट केले नाहीत, अशा लोकांना विनंती आहे की त्यांनी कागदपत्रे अपडेट करून घ्यावीत.
UIDAI ने आधार कार्ड धारकांना विहित शुल्कासह डॉक्यूमेंट अपडेट करण्याची सुविधा प्रदान केली आहे, आधार कार्ड धारक हे दोन दस्तऐवज वैयक्तिक ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) म्हणून आधार डेटामध्ये अपडेट करू शकतात.
माय आधार पोर्टलद्वारे (https://myaadhaar.uidai.gov.in/) या सुविधेवर ऑनलाइन प्रवेश केला जाऊ शकतो किंवा त्याचा लाभ घेण्यासाठी रहिवासी कोणत्याही जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊ शकतात.
हे देखील पहा :