अंतर्गत कलहामुळे अचानक महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाऊन नव्याने संसार थाटलेल्या राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी विरोधात शरद पवार गटाने आक्रमक रणशिंग फुकलेला असतानाही त्यांना आता नवीनच झटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या गटाला साथ देणारा आणि अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांवर कायमच ताशेरे ओढणारा खासदार आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडणार आहे, व अजित पवार यांना समर्थन देणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
लवकरच तथाकथित खासदार त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे यातच त्या खासदाराने अजित पवार यांना समर्थन देणार असल्याचं प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिल्याची माहिती समोर आलेली आहे.
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षांमध्ये झालेल्या फुटीमुळे पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाला जाणार याचा वाद सुरू आहे, त्यातच दुसरीकडे दोन्ही गटाचे आमदार यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे काळे ढग फिरत आहेत, त्यामुळे एकमेकांना नोटीस देण्याचा प्रकार सुरू आहे, तसेच तिसरीकडे आगामी काळातील निवडणुकीच्या गोष्टी लक्षात ठेवून आमदार आणि खासदार आपल्या समर्थना विषयीच्या दिशा राजकारणामध्ये स्पष्ट करत आहेत. यातच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी तसेच अजित पवार या दोघांविरुद्ध उघड संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. परंतु सोबतीचे शिलेदार मात्र अजित पवार गटाला सामील होण्यास तत्परता दाखवत आहेत यामुळे शरद पवार यांचे राजकीय वर्चस्व आणि वट कमी होईल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून समोर मांडण्यात येत आहे.
अजित पवार गटामध्ये सामील होणारे ते दोघे आहेत तरी कोण?
2024 मध्ये महाराष्ट्र राज्य मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे आणि अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर समर्थन अजितदादांना मिळत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी उरलेसुरले आमदार खासदारही अजित पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार गटामध्ये सामील होणारे लोकसभेतील खासदार आणि विधानसभेतील आमदार हे एकाच जिल्ह्यामधील आहेत. अशी बातमी समोर आली आहे, तसेच सदर खासदारांनी आमदार घट्ट मित्र आहे त्यामुळेच दोघांनी चर्चा करून आणि विचार विनिमय करून, तसेच जवळच येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांना साथ देणार असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिले आहे.
शरद पवार गटामध्ये सध्या एकूण सहा खासदार उरलेले आहेत. त्यामध्ये लोकसभेतील चार खासदार आहेत, तर राज्यसभेतील दोन खासदार आहेत, त्यामध्ये शरद पवार यांचे जिवलग मित्र श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, आणि मोहम्मद फैजल हे लोकसभेतील खासदार शरद पवार गटामध्ये सध्या शिल्लक आहेत. तर वंदना चव्हाण आणि फौजीया खान या दोन राज्यसभेतील खासदार अजूनही शरद पवार यांना साथ देण्यास अडून आहेत. परंतु दुसरीकडे शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू आणि लोकसभेतील खासदार सुनील तटकरे तसेच राज्यसभेतील प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अजित पवार यांना उघडपणे समर्थन देऊन शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत.
आता लोकसभेतील उरलेल्या चार खासदारांमधील नेमकं कोणता खासदार शरद पवार यांच्या विरोधात जाऊन अजित पवार यांचे हात बळकट करणार आहे, याची जोरदार चर्चा सगळीकडेच सुरू आहे.
हे पण पहा: Honda Hornet च्या यशानंतर Hornet 2.0 मॉडेल बाजारात, लूक एकदम खतरनाक