खेड(मंदार आपटे): खेड तालुक्यातील चोरवणे गावातील जागृत देवस्थान ग्रामदैवत आदिशक्ती श्रीरामवरदायिनी,झोलाई,मानाई व वाघजाई.नुकतेच देवीचे काळ्या पाषाणातील हेमाडपंथीय मंदिर बांधलेले असून राज्यातून व राज्याबाहेरूनही असंख्य भाविक दर्शनास येत असतात.स्वप्नांना सत्याचा मार्ग दाखविणारी,हाकेला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून ख्यातनाम असलेल्या या देवीचे स्थान आज भाविकांचे श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आले आहे. किंबहुना महाराष्ट्र शासनाने “क” दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रामाणित सुध्दा केले आहे.
चोरवणे ग्रामवासीयांच्या वतीने देवस्थानच्या पालखीतील आदिशक्ती श्रीरामवरदायिनी, झोलाई,मानाई,वाघजाई देवीच्या चांदीच्या नूतन रुपी चिपळूणचे सुवर्णकार श्री.राजन लवेकर यांच्याहस्थे नुकत्याच साकारण्यात आल्या आहेत.तसेच नवीन चांदीची प्रभावळ सुवर्णकार श्री.देवरुखर दादर मुंबई यांनी बनवलेली आहे. बुधवार दिनांक १५ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ वाजता देवता पुजन,९:३० वाजता गणपती पूजन,पुण्याहवाचन,मातृका पूजन,देवानांदी, मधुपर्क आचार्यवरण,१०:१५ वाजता मणिक शुद्धी,१०:३० वाजता देवी सप्तशती पाठ प्रारंभ,नवग्रह स्थापन पूजा,देवी आवाहन, पूजन,दुपारी १२:३० वाजता आरती,दुपारी १ वाजता महाप्रसाद,दुपारी ३ वाजता महिला हळदीकुंकू,सायंकाळी ५:३०वाजता जुन्या मूर्तीची कला संकोच,नवीन मुर्तीना अधिवास, सायंकाळी ७ वाजता आजी माजी सैनिकांचा सत्कार सोहळा,रात्री ८ वाजता महाप्रसाद,रात्री १० वाजता हरी जागर भजन,१६ मार्च २०२३ रोजी सकाळी गणेश पूजन,पुण्याहवाचन,स्थळशुद्धी,आवाहित देवता पूजा,सकाळी १०:३० वाजता नवीन मुर्तीची चरप्राणप्रतिष्ठा,नवग्रह,नवचंडी हवनास प्रारंभ,सकाळी ११ वाजता श्रीरामवरदायिनी देवी पूजा प्रारंभ,पंचामृत अभिषेक शहाळे अभिषेक,कुंकूम अर्चना, पुष्पालंकार,आरती,सकाळी ११:३० वाजता कुमारी पूजन, सुवासिनी पूजन,दुपारी १२:३० वाजता यज्ञाची पूर्णाहुती, आवाहित देवता उत्तर पूजा श्रीरामवरदायिनी देवी आरती, तीर्थ प्रसाद वितरण,ब्राह्मण दक्षिणा आणि आशीर्वचन,दुपारी १२ वाजता मान्यवरांचे स्वागत मनोगत व आभार,दुपारी १:३० वाजता महाप्रसाद.
तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीरामवरदायिनी देवस्थान कमिटी चोरवणे व ग्रामविकास मंडळ चोरवणे, मुंबई-पुणे आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गुहागर विधानसभा मतदार संघाचे सन्मानिय आमदार श्री. भास्करराव जाधव साहेब, सन्मानिय श्री.संजयजी महापदी साहेब(उद्योजक दुबई),सन्मानिय सौ.पल्लवीताई कदम(उपमहापौर ठा.न.पा),सन्मानिय श्री.गणेशशेठ फाळके साहेब(उद्योजक दुबई),सन्मानिय श्री.अनिलजी जाधव साहेब(सरपंच-तांबाटी ग्रामपंचायत खोपोली) आणि तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे देखील पाहा :