ज्ञानदीप बालभवन, भडगावमध्ये गोपाळकाला निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न

मंदार आपटे-
खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड रत्नागिरी संचालित ज्ञानदीप बालभवन भडगाव या प्रशालेमध्ये बालवाडीच्या विध्यार्थ्यासांठी गोपाळकाला निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रशालेतील नर्सरी, लहान गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी गोपाळकाला निमित्त आयोजित करण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या. झाशीची राणी लक्ष्मिबाई, वकील, भारतमाता, कोळीण, डॉक्टर, पोलीस, झाड, श्रीकृष्ण, राधा, पंडीत जवाहरलाल नेहरू, भाजीवाली, शेतकरी अशा विविधांगी व्यक्तिरेखांनी प्रशालेचा परिसर फुलून गेला होता. सदर स्पर्धेत नर्सरीच्या वर्गातून तनुजा पातळे, ध्रुव शिंदे, शुभ्रा काटकर या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला.

लहान गटातून स्वराज रेडीज, रुद्रा सापटे, स्मरण वारेकर या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला व मोठ्या गटामधून स्पृहा बेर्डे, अवनी चिले, सुदीक्षा शिळकंदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून विजय शिंदे, योगेश चिले, सचिन बर्डे, प्रज्ञा मोरे, राजेंद्र नाटेकर, आणि अंजली जाधव मॅडम यांनी काम पाहिले.या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्पर्धा प्रमुख सुनयना सावंत, राधा भालेकर, अश्विनी दांडेकर, नेहा सुर्वे यांनी काम पाहिले.

या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद तोडकरी उपाध्यक्ष श्री माधव पेठे खजिनदार श्री विनोद बेंडखळे सरचिटणीस प्रकाश विश्रांती जनसंपर्क अधिकारी डॉक्टर तलाठी नियामक मंडळाचे चेअरमन श्री भालचंद्र कांबळे प्रशांत समितीचे विश्वस्त आणि सभासद तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे मॅडम प्रशालेचे प्राचार्य राजकुमार मगदूम सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

हे देखील वाचा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!