खेड – मंदार आपटे
खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इंग्लिश ऑलंपियाड मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल इंग्लिश ऑलंपियाड (IEO) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
इ. 7 वी तील अनुराग महादेव वाघमोडे शालेयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त व पुढील परीक्षेकरिता पात्र, आर्यन बाळासाहेब भगत शालेयस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त. ओम राकेश घोलप शालेयस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, 8 वी तील प्रथमेश अमोल भिडे शालेयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त व पुढील परीक्षेकरिता पात्र, श्रावस्ती प्रभाकर कांबळे शालेयस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, आष्का रुपल पाटणे शालेयस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त तर इ. 9 वी तील प्रांजल सुदेश घाग शालेयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त व पुढील परीक्षेकरिता पात्र, सई सुदेश घोडे शालेयस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, शमिका सुधीर शिंदे शालेयस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त तसेच इ. 10 वी तील परीमल विनोद स्वामी याने शालेयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
त्याचप्रमाणे इ. 12 वी वाणिज्य तील सिध्दांत सलील जागुष्टे शालेयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त व पुढील परीक्षेकरिता पात्र, आकाश अभिजीत शिंदे शालेयस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त व पुढील परीक्षेकरिता पात्र, साद कबीर राजपूरकर शालेयस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त व पुढील परीक्षेकरिता पात्र, रोशनी दीपक देवळेकर शालेयस्तरावर चौथा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, प्राची उदय कलमकर, फरदीन बशीर पेटकर, माझ रीयाझ पेटकर शालेयस्तरावर पाचवा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, सिमरा रिझवान देसाई, सानिया इर्षाद नाडकर, झैनाब गुलाम हुसैन सिध्दिकी, मेहमूद मेहबूब सिध्दिकी शालेयस्तरावर सहावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, स्मित जयराज वेदक शालेयस्तरावर सातवा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, अथर्व प्रवीण छपरे शालेयस्तरावर आठवा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, फराह उसमान चौगुले, राही रवींद्र गायकर शालेयस्तरावर नववा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, सानिका सुहास कदम शालेयस्तरावर दहावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, उपेंद्र उमेश आठवले शालेयस्तरावर अकरावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त,
इ. 12 वी विज्ञान मधील आसरा मेहबूब सिध्दिकी शालेयस्तरावर बारावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, अमिताभ निलेश शिंदे शालेयस्तरावर तेरावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, अंजली संतोष देशमुख शालेयस्तरावर चौदावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, मरीयम इर्षाद देसाई शालेयस्तरावर पंधरावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, तन्मय प्रकाश लटके शालेयस्तरावर सोळावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, बिलाल दिलदार तिसेकर शालेयस्तरावर सतरावा क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त, अफराह अनीस पोत्रिक हीने शालेयस्तरावर अठरावा क्रमांक व गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
सदर विद्यार्थ्यांना शांतिलाल आव्हाड, रवींद्र ओकटे व संजय पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, संस्थेचे उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा व सर्व विश्वस्त व सभासद, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.