ज्ञानदीप भडगावमध्ये गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न

खेड (मंदार आपटे) :
खेड – येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ] खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर] भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर] भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेमध्ये महान भारतीय गणित तज्ज्ञ ‘श्रीनिवास रामानुजन’ यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून प्रशालेत गणित प्रदर्शनासोबत रांगोळी, फलक लेखन व भित्तीपत्रक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, ज्ञानदीप महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, सैनिक स्कूल जामगेचे विलास येलपले, ज्ञानदीप इंग्लिश मिडीअम स्कूल बोरजचे समीर सागवेकर, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख विठ्ठल सकुंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे इ. उपस्थित होते.

या गणित प्रदर्शनामध्ये इ. 9 वी व 11 वी गटातील गणित प्रतिकृतींचे परीक्षण ज्ञानदीप इंग्लिश मिडीअम स्कूल बोरजचे समीर सागवेकर व विलास येलपले सर छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे, यांनी केले. विद्यार्थ्यांची सृजनशीलता, कल्पनाशक्ती व गणितीय दृष्टिकोन विकसीत व्हावा यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात एकूण 76 प्रतिकृतींचे निरीक्षण व अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. प्रशालेच्या उच्च माध्यमिक विभाग प्रमुख व गणित शिक्षक विठ्ठल सकुंडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून तसेच गणित शिक्षक संदेश जाधव, कांतिनाथ शिंदे, विनोद टेंबे, रागिणी जामकर यांच्या मार्गदर्शनामुळे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विशेष सहकार्याने हे गणित प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले.

या प्रदर्शनातील सहभागी प्रत्येक वर्गातून प्रथम तीन क्रमांकांच्या प्रतिकृतींची निवड केली. इ. 9 वी तून सई सुदेश घोडे व प्रांजल सुदेश घाग यांच्या Verify the identities by geometrical proof या प्रतिकृतीचा प्रथम, शमिका सुधीर शिंदे व समृध्दी दत्तात्रय बंडगर यांच्या Pythagoras theorem या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक तर स्वरा संतोष माळी व जान्हवी महेंद्र खांबल यांच्या Geometrical City तसेच वेदिका गणोजी माने व सायली राजेंद्र भालेकर यांचा Day of any date या प्रतिकृतींचा विभागुन तृतीय क्रमांक आला.

तसेच इ. 11 वी व 12 वी तून वेदांत अनिल चिनके व प्रणेश कैलास वाडकर यांच्या Aristotaleparadox या प्रतिकृतीचा प्रथम, अग्रणी बाळासाहेब भगत व पूर्वा सचिन कुळे यांच्या Probability या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक तर सानिया संदिप चव्हाण व सानिया संजय चव्हाण यांच्या Trigometric graph तसेच आर्या प्रताप घोसाळकर व स्वरा सुशांत केळसकर यांचा 3D geometrical shapes या प्रतिकृतींचा विभागुन तृतीय क्रमांक आला.

फलकलेखन स्पर्धेत इ. 7 वी चा प्रथम, इ. 9 वी चा द्वितीय व इ. 6 वी चा तृतीय क्रमांक आला. रांगोळी स्पर्धेत इ. 9 वी चा प्रथम, इ. 7 वी चा द्वितीय व इ. 6 वी चा तृतीय क्रमांक आला. भित्तीपत्रक स्पर्धेत तनिष निकेत काणेकर याचा प्रथम, अंतरा अविष पाटील हिचा द्वितीय व अनुराग महादेव वाघमोडे याचा तृतीय क्रमांक आला. सदर उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, संस्थेचे उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा व सर्व विश्वस्त व सभासद, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हे देखील पाहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!
CLOSE AD