खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ , खेड संचालित ज्ञानदीप विद्या संकुल, भडगाव या प्रशालेमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे, सभाधीटपणा वाढवणारे, संस्कृती परंपरा जोपासणारे, विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातात.
सध्या इंग्रजी विषयाचे वाढते महत्व लक्षात घेता त्या विषयाची गोडी वाढावी म्हणून शाळा स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचाच भाग म्हणून शाळेत ३१ डिसेंबर २०२२ रोजी आसावरी बापट मॅडम, समुपदेशक पुणे व प्रा. श्रीरंग बापट, तज्ज्ञ मार्गदर्शक, पुणे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम यांच्या उपस्थितीत ENGLISH DAY मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
सदर उपक्रमात नर्सरी ते ११ वी पर्यंतच्या ६५० विद्यार्थ्यांनी Poem Drammas, puzzles, word ladder, tongue twister असे जवळजवळ 40 कार्यक्रम सादर केले. सर्व गाणी स्वत: म्हणून साभिनय सादर केली. हे कार्यक्रम पाहताना मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता कार्यक्रमाच्या शेवटी सान्त्ताक्लॉझ व टेडीबेअरच्या प्रवेशाने मुले आनंदाने नाचू लागली . त्यांनी सर्व मुलांना चॉकलेट वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
या स्पर्धेच्या यशस्वीतेकरता स्पर्धा प्रमुख अंजली जाधव, विजय शिंदे सर, योगेश चिले सर, सचिन बेर्डे. सर प्रज्ञा मोरे , राजेंद्र नाटेकर सर, ज्योत्स्ना खेडेकर व सुनयना सावंत, राधा भालेकर, अश्विनी दांडेकर व नेहा सुर्वे , पाटील सर, ओकटे सर व आव्हाड सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशालेकडून व संस्थेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अरविंद तोडकरी, माधव पेठे, प्रकाश गुजराथी, पेराज जोयसर, विनोद बेंडखळे, भालचंद्र कांबळे, दीपक लढढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
हे देखील पहा :