मंदार आपटे:
खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) या प्रशालेतील व इ. 11 वी विज्ञान च्या वर्गात शिकणारा मंथन शशांक बुटाला ‘इतिहास शिक्षक महामंडळ’ महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत ( इयत्ता 10 वी ) 100 पैकी 91 गुण मिळवून राज्यात प्रथम आला त्याबद्दल त्याला ‘ इतिहास कुमार प्रज्ञावंत’ हे मानांकन , प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक प्राप्त झाले आहे.
मंथन याला मागदर्शक शिक्षक संतोष भोसले, दिलीप मोहिते, महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
मंथनच्या या यशाबद्दल संस्थेचे अरविंद तोडकरी, माधव पेठे, प्रकाश गुजराथी, पेराज जोयसर, विनोद बेंडखळे, भालचंद्र कांबळे, दीपक लढढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
हे देखील पहा :