मंदार आपटे (खेड): लहान मुलांना इतिहास समजावा व मोबाईल व संगणक मध्ये न रमता लाल मातीतील सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत म्हणून खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित श्री· रा· धो· पाटणे ज्ञानदीप विद्यासंकुल भडगाव या प्रशालेमध्ये मध्ये दिवाळीनिमित्ताने किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते· यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. आजच्या लहान पिढीला इतिहास जवळून अनुभवता यावा याकरिता लहानग्यांना सोबत घेऊन या स्पर्धेत वर्गशिक्षकांनी आकर्षक किल्ले बनवले.
दगड, माती, पोत, धान्याचे पीठ व इतर आवश्यक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने किल्ले साकारले. या उपक्रमाने किल्ल्याची स्वच्छता, संवर्धन त्यांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. शिवाजी महाराज की जय , जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी विद्यार्थ्यांनी शालेय परिसर दुमदुमून टाकला. मर्यादित वेळेत वर्गशिक्षकांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 1 ली ते 4 थी च्या वर्गामध्ये इयत्ता 1 ली च्या वर्गाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 1 ली ते 4 थी च्या वर्गाचे परीक्षण श्री· संतोष भोसले व श्री. योगेश चिले सर यांनी केले. तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये कंदील उपक्रम देखील राबवण्यात आला.
या स्पर्धेच्या यश्स्वीततेकरता स्पर्धा प्रमुख सौ. अंजली जाधव, श्री. विजय शिंदे सर, श्री. योगेश चिले सर, श्री. सचिन बेर्डे सर, सौ. प्रज्ञा मोरे, श्री. राजेंद्र नाटेकर सर, सौ. ज्योत्स्ना खेडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशालेकडून व संस्थेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष श्री. माधव पेठे, सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, प्रशाला समितीचे चेअरमन श्री. भालचंद्र कांबळे, खजिनदार श्री. विनोद बेंडखळे, सर्व विश्वस्त आणि सभासद, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य श्री. राजकुमार मगदूम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
हे देखील पहा :