खेड-(मंदार आपटे) :
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस पदी माधव पेठे तसेच विश्वस्त पदी दीपक लढ्ढा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे संस्थेच्या स्थापनेपासून सरचिटणीस पदाची धुरा प्रकाश गुजराथी यांनी यशस्वीपणे व वैशिष्ट्यपूर्ण अशी सांभाळलेली आहे.
परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांनी माधव पेठे यांच्याकडे सुपूर्द केली. माधव पेठे यांनी उपाध्यक्ष पदाची जबाबदारी १४ वर्षापासून यशस्वीपणे अशी सांभाळलेली आहे.
ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या चेअरमन पदाची जबाबदारी यांनी गेली ४ वर्ष उत्तमरित्या सांभाळत आहेत. डॉ. रमणलाल तलाठी यांनी संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी म्हणून गेली १४ वर्ष उत्तमरित्या जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ज्ञानदीप महाविद्यालयाचे सी.डी.सी. व नियामक मंडळाचे चेअरमन म्हणून ४ वर्ष दीपक लढ्ढा यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
या सर्वांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरचिटणीस माधव पेठे, प्रकाश गुजराथी, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढ्ढा, खजिनदार विनोद बेंडखळे, संस्थेचे सदस्य भालचंद्र कांबळे, प्रफुल्ल महजन , रुपल पाटणे, सर्व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील पहा : खेड तालुक्यातील महाई सेवा केंद्र संघटनेची स्थापना करण्यात आली!