खेड – (मंदार आपटे)
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) च्या रौप्यमहोत्सवाचे 30 मार्च ‘रामनवमी रोजी’ संस्थेचे अध्यक्ष मा. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष मा. माधव पेठे, सरचिटणीस मा. प्रकाश गुजराथी व सर्व संस्थापक सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होणार आहे.
त्या निमित्ताने पुणे येथील कलावंत व ज्ञानदीप कलामंच यांचा ‘वसंतगान’ (सांगितिक कार्यक्रम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ज्ञानदीप विद्या संकुल’ भडगावच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अरविंद तोडकरी असणार आहेत.
ज्ञानदीपच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण ज्ञानदीप परिवार तयारी करीत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड, रत्नागिरी या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
या रौप्यमहोत्सवानिमित्त गेल्या 25 वर्षाचे सिंहावलोकन व भविष्याचा वेध यावर विचारमंथन होणार आहे. या रौप्यमहोत्सवानिमित्त सर्व स्तरांतून संस्थेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे देखील पहा👇👇: