ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा झाला

खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित श्री रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव (प्राथमिक) विभाग या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला· या कार्यक्रमाचे औचित्य साधून इ· १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील संपन्न झाला·

या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून खेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी, संस्थेचे संस्थापक सदस्य व श्री· रा· धो· पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर प्रशाला समितीचे चेअरमन मा· श्री भालचंद्र कांबळे साहेब लाभले होते· भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मा· श्री· भालचंद्र कांबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले· प्रशालेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ पूर्वा मोरे, सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवात  इ. १ ली व ५ वी च्या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर समूह गीतगायनाने करण्यात आली.

यावेळी इ. ४ थीच्या वर्गातील कु सई गजानन पालांडे या विद्यार्थीनीने मी तिरंगा बोलतोय या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री योगेश चिले सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संकल्पना व त्याचे महत्व समजावून दिले. प्रशालेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले त्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाच्या प्रसंगी घेण्यात आला ·इ· १ ली ते ५ वी पर्यंतच्या जे विद्यार्थी या स्पर्धेत बक्षीसपात्र ठरले त्यांना प्रशालेकडून प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले·

मा· श्री भालचंद्र कांबळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व मुख्याध्यापिका सौ पूर्वा मोरे यांनी विद्यार्थ्यांजवळ संवाद साधत त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीर हुतात्म्यांच्या बलिदानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ अंजली जाधव यांनी केले.

या स्पर्धेच्या यश्स्वीततेकरता स्पर्धा प्रमुख सौ. अंजली जाधव, श्री. विजय शिंदे सर, श्री. योगेश चिले सर, श्री. सचिन बेर्डे. सर सौ. प्रज्ञा मोरे. श्री. राजेंद्र नाटेकर सर, सौ. ज्योत्स्ना खेडेकर व श्रीमती सुनयना सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशालेकडून व संस्थेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.    

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष श्री. माधव पेठे, सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, प्रशाला समितीचे चेअरमन श्री. भालचंद्र कांबळे, खजिनदार श्री. विनोद बेंडखळे, सर्व विश्वस्त आणि सभासद, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य श्री. राजकुमार मगदूम, शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!