ज्ञानदीप विद्यामंदिर मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन

खेड (मंदार आपटे) : खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप विद्यासंकुल भडगाव या प्रशालेमध्ये मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमेंचे पूजन व पुष्पहार अर्पण प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ पूर्वा मोरे मॅडम यांनी व माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्रीभोसले सर यांनी केले महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती सौ अंजली जाधव यांनी सांगितली व रामचंद्र भिंगारे यांनी महात्मा गांधीवर आधारित स्वरचित ‘गांधीजी असते तर’ ही कविता सादर केली तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रशालेत कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत इयत्ता १ लीच्या स्वतंत्र गटातून अजिंक्य घुले, मनस्वी दामले यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहे, इयत्ता २ री व ३ रीच्या लहान गटातून आर्या सानप, श्रीहर्ष वाघमोडे, व प्रणव जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला तसेच इयत्ता ४ थी व ५ वीच्या मोठया गटातून आस्था सकपाळ, दक्ष निर्मळ, व आर्य मोरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या स्पर्धेच्या यश्स्वीततेकरता स्पर्धा प्रमुख सौ. अंजली जाधव, श्री. विजय शिंदे सर, श्री. योगेश चिले सर, श्री. सचिन बेर्डे. सर सौ. प्रज्ञा मोरे. श्री. राजेंद्र नाटेकर सर, सौ. ज्योत्स्ना खेडेकर व श्रीमती सुनयना सावंत, सौ. राधा भालेकर, सौ. अश्विनी दांडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशालेकडून व संस्थेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष श्री. माधव पेठे, सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, प्रशाला समितीचे चेअरमन श्री. भालचंद्र कांबळे, खजिनदार श्री. विनोद बेंडखळे, सर्व विश्वस्त आणि सभासद, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य श्री. राजकुमार मगदूम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!