ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाल्यानंतर खेडमध्ये जल्लोष

खेड (मंदार आपटे) : कोकण शिक्षक मतदार संघातून बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीचे ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाल्याचे  समजल्यानंतर  खेड शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

जोरदार घोषणा देत शहरातून मिरवणूक काढण्यात आली या वेळेला बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे अनेक पदाधिकारी  मिरवणुकीत सामील झाले होते.

या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी, तालुका  महिला आघाडी व युवा सेना, युवती सेना तसेच  भाजपच्या अनेक  पदाधिकाऱ्यांनी  आनंद व्यक्त केला.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!