Gold Price Today 26 October 2024: सणासुदीच्या काळात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांनी गगनाला भिडले होते, ज्यामुळे सर्वसामान्य माणसांसाठी त्यांची खरेदी करणं अवघड झालं होतं. सोन्याचे दर 80 हजारांपेक्षा जास्त आणि चांदीचे दर जवळपास एक लाख रुपयांच्या आसपास पोहोचले होते. पण आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामागचं कारण असं आहे की ज्वेलर्स आणि रिटेल विक्रेत्यांकडून मागणी कमी झाल्याचं दिसत आहे. याचे कारण म्हणजे वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सोने-चांदीच्या खरेदीकडे दुर्लक्ष केलं आहे.
Gold Price Today 26 October 2024
शहर | 22 कॅरेट आजचा भाव (1 ग्रॅम) | 24 कॅरेट आजचा भाव (1 ग्रॅम) | 18 कॅरेट आजचा भाव (1 ग्रॅम) |
---|---|---|---|
चेन्नई | ₹ 7,360 | ₹ 8,029 | ₹ 6,060 |
मुंबई | ₹ 7,360 | ₹ 8,029 | ₹ 6,022 |
दिल्ली | ₹ 7,375 | ₹ 8,044 | ₹ 6,034 |
कोलकाता | ₹ 7,360 | ₹ 8,029 | ₹ 6,022 |
बेंगळुरू | ₹ 7,360 | ₹ 8,029 | ₹ 6,022 |
हैदराबाद | ₹ 7,360 | ₹ 8,029 | ₹ 6,022 |
केरळ | ₹ 7,360 | ₹ 8,029 | ₹ 6,022 |
पुणे | ₹ 7,360 | ₹ 8,029 | ₹ 6,022 |
वडोदरा | ₹ 7,365 | ₹ 8,034 | ₹ 6,026 |
अहमदाबाद | ₹ 7,365 | ₹ 8,034 | ₹ 6,026 |
भारतामध्ये सोन्या-चांदीच्या दरात घट
यावर्षी सप्टेंबरपासूनच गणेश चतुर्थी, त्यानंतर दसरा आणि आता दिवाळी या सणांमुळे मागील दीड-दोन महिन्यांपासून सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. बजेट वाढत असतानाही ग्राहकांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण आता वाढत्या दरांमुळे त्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. याचसोबत परदेशातील युद्धाचे (इराण विरुद्ध इजराइल) वातावरण आणि त्यातील संघर्षांचा परिणामही सोन्याच्या दरांवर दिसून येत आहे. जर तुम्ही सुद्धा सोनं-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर आजचे दर नक्की जाणून घ्या.
या शुक्रवारी ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आली आहे. नवी दिल्लीमध्ये सोन्याचे दर 1,150 रुपयांनी घसरून आता 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत, तर चांदीच्या दरातही 2,000 रुपयांची घट होऊन ती आता 99,000 रुपये प्रति किलो झाली आहे. गुरुवारी मात्र सोन्याचे दर 81,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 1,01,000 रुपये प्रति किलो होते.
सोन्या-चांदीच्या दरात घट का?
स्थानिक बाजारातील ज्वेलर्स आणि रिटेल विक्रेत्यांकडून मागणी कमी झाल्यामुळे आणि परदेशातील बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे समजते. काही तज्ञांच्या मते, डिसेंबरपर्यंत सोन्याच्या किंमतीत आणखी 3,000 रुपयांची घट होण्याची शक्यता आहे, तसेच चांदीचे दरही आणखी 4,000 रुपयांनी कमी होऊ शकतात.
अधिक वाचा: Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त! आजचा सोन्याचा ताजा भाव इथे पहा