राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आजही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज मुंबई आणि पुण्यालाही यलो अलर्ट देण्यात आला असून अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) नैर्ऋत्य राजस्थानातून माघार घेतली असून राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. 26) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई आणि पुण्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत आज सकाळपासूनच हलका पाऊस सुरू झाला आहे. पुण्यातही आज आणि उद्या (मंगळवार, बुधवार) मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) नैर्ऋत्य राजस्थानातून माघार घेतल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला असून, दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सूनने राजस्थानातून काढता पाय घेतला आहे. गतवर्षी 20 सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते
राज्यात पावसाचा जोर ओसरला
राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सोमवारी (ता. 25) ओसरला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील काही धरणांत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.
हे पण वाचा: शाहरुख खानचा जवान बॉक्स ऑफिसवर सुसाट! जगभरात तब्बल 1 हजार कोटींची कमाई