आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी त्यांच्या संपत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि घरही चर्चेत राहतात. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य किती शिकले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग मुकेश-नीता अंबानी ते आकाश-अनंत अंबानी यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात.
मुकेश अंबानी: दिवंगत धीरूभाई अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतूनच घेतले. त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेशही घेतला. पण शिक्षण अर्धवट सोडून ते भारतात आले आणि त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी हे 97.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
नीता अंबानी: गुजराती कुटुंबात जन्मलेल्या नीता अंबानी यांचा विवाह मुकेश अंबानी यांच्याशी 1985 मध्ये झाला होता. नीता अंबानी यांच्या शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर त्या पदवीधर आहेत. त्यांनी मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्या व्यावसायिक भरतनाट्यम शिक्षिकाही आहेत. नीता अंबानी या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक आहेत.
आकाश-श्लोका अंबानी: मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा अध्यक्ष आहे. याआधी त्यांनी गेल्या वर्षी कंपनी बोर्डात बिगर कार्यकारी संचालकपदही भूषवले होते. मुंबईत जन्मलेल्या आकाश अंबानीने कॅम्पियन स्कूल आणि मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. पत्नी श्लोका मेहताबद्दल सांगायचे तर, तिनेही आकाशसोबत धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी प्रिन्स्टन विद्यापीठात गेले. यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली.
ईशा अंबानी-आनंद पिरामल: मुकेश आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी रिलायन्स ग्रुपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रिलायन्स रिटेलची जबाबदारी तिच्या खांद्यावर आहे आणि ईशा अंबानी ती वेगाने पुढे नेत आहे. ईशा अंबानीने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही मिळवली.
ईशाचे पती आणि अंबानी कुटुंबातील जावई आनंद पिरामल हे उद्योगपती अजय पिरामल यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी फिलाडेल्फिया (यूएसए) येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पूर्ण केले आहे.
अनंत अंबानी-राधिका मर्चंट: अनंत अंबानी यांनीही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर ते ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये गेले. ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाले. सुरुवातीला अनंत यांना जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डवर जबाबदारी देण्यात आली होती. आता तो सध्या रिलायन्सचा ऊर्जा व्यवसाय सांभाळत आहे. तो इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा सह-मालक देखील आहे. त्याची मंगेतर राधिका मर्चंट न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर झाली आहे.
हे पण वाचा: Weekly Horoscope: नव्या आठवड्यात ‘या’ राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशिभविष्य