आय.सी.एस. महाविद्यालयाने राखली उत्तम निकालाची परंपरा

खेड (मंदार आपटे) :
भडगाव खोंडे येथील आय.सी.एस. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या विविध परिक्षांमध्ये आपल्या उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्यच्या सेमिस्टर वी परीक्षे मध्ये महाविद्यालयाचे ‘ए प्लस’ मिळवून 9 विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मिळवून 46 विद्यार्थी, ‘बी प्लस’ ग्रेड मिळवून 24 विद्यार्थी, विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कु. मुस्कान अब्दुल कादिर साहीबोले या विद्यार्थिनीने 9.60 (CGPI) ग्रेड सह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. अफिया अब्दुल कादिर नाडकर हिने 9.58 (CGPI) ग्रेड सह द्वितीय क्रमांक पटकावला, तसेच कु. रमीसा हिशामुद्दीन हमदुले या विद्यार्थिनीने 9.56 (CGPI) ग्रेड सह तृतीय क्रमांक मिळविला.

याबरोबरच याच वर्षी सुरु झालेल्या एम.कॉम सेमिस्टर चा निकालही 63.41% एवढा लागला असून कु. तहूरा असलम अलवारे हिने 9.25 (CGPI) ग्रेड सह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला कु. फर्जिन इब्राहिम पठाण व कु. झरीन फारूक परकार यांनी 9.00 (CGPI) ग्रेड सह संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कु. हुदा महंमद घरटे तसेच कु. नाझीश सलीम खोत व कु. नमीरा नियाज महाडिक यांनी 8.75 (CGPI) ग्रेड सह संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच यंदा सुरु झालेल्या एम.एस्सी.(रसायन शास्त्र) भाग 1 शिक्षणक्रमाचा निकाल संपूर्ण जिल्हयात उत्कृष्ट ठरला आहे. त्यात कु. मानसी चंद्रकांत मनवळ हिने 9.67 (CGPI) ‘ए प्लस’ ग्रेड सह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कु.मानसी मधुकर जाधव हिने 9.50 (CGPI) ‘ए प्लस’ ग्रेड सह द्वितीय क्रमांक तर कु. प्रियांका विजय गोरूले हिने 8.25 (CGPI) ‘ए’ ग्रेड सह तृतीय क्रमांक पटकावला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.हिराभाई बुटाला, कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले, प्र.प्राचार्या प्रोफेसर डॉ.अनिता आवटी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व यापुढेही विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात यशस्वी वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापक वर्गाचेही संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्र.प्राचार्या यांनी अभिनंदन केले आहे.

हे देखील पहा : आय.सी.एस. महाविद्यालयात चैतन्य वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!