खेड मंदार आपटे
खेड शहरातील ब्राम्हण आळी येथील कृत्तिका धामणकर यांच्या आयडिया प्ले ग्रुप नर्सरी चे स्नेसंमेलन नुकतेच शनिवार दि. 17रोजी सायंकाळी 4वाजता लक्ष्मी नारायण देवस्थानात उत्साहात पार पडले.
यावेळी या स्नेसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिशिका माधवी जोशी मॅडम उपस्थित होत्या तसेच सहजीवन शाळेचे राठोड सर लायन्स च्या अध्यक्ष संपदा गुजराथी व त्याच्या सहकारी उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्ष जोशी मॅडम यांनी अध्यक्ष भाषणं करताना सांगितले की प्ले ग्रुप मध्ये शिक्षनाचा पाया आहे. आणि पाया भक्कम असेल तर पुढील अभ्यास सोपा होतो तसेच राठोड सर व संपदा गुजराथी यांनी पालकाना व आयोजकांकडून घेण्यात येणार कार्यकमला शुभेच्छा दिल्या.
यावेळी या नर्सरी च्या मुलांनी डान्स करत निरनिरळया वेशभूषा केल्या होत्या यामध्ये बालशिवाजी महाराज, आदिवासी, द्राक्ष, डॉक्टर, रॉकेट, मराठी मुलगी, मद्रासी अण्णा, वाघ, झाशीची राणी यासरखे अनेक निरनिराळे वेश परिधान करत आपली कला सादर करण्यात आली. मुलांनी सादर केलेल्या गाण्यावर पालक ही थिरकत होते. अनेक डान्स ला वन्स मोर मिळत होता. या सर्व मुलांना शाळेकडून गिफ्ट देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृत्तिका धामणकर, पल्लवी बारट्टके, भारती दांडेकर, राजश्री डबे यांनी मेहनत घेतली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार आपटे यांनी केले तर आभार भारती दांडेकर यांनी मानले.
हे देखील पहा :