मंदार आपटे :
शहरात रात्र भ रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे शहरात पहाटेच पाणी आले आहे खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजिनियर जवळ पाणी आले आहे.
तसेच खेड शहरातील मच्छी मार्केट येथेही पाणी भरले आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सर्व शाळा व कॉलेज यांना सुट्टी देण्यात आली आहे.
व्यापारी बंधूंनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित हलवायला सुरुवात केली असून अनेक घरांमध्येही सामानाची आवरावर करताना नागरिक दिसत आहेत.
हे देखील पहा : PM Kisan Yojana: १४वा हप्ता या दिवशी मिळणार, सरकार द्वारे तारीख जाहीर!