मंदार आपटे:
खेड शहरातील भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सव यंदा साजरा करण्यात आला यावेळी खेड दापोली मंडणगड येथून अनेक गोंविदा पथक आले होते .
यावेळी स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली यावेळी कादंबरी वैद्य, अमृता काणे,सृष्टी काणे यांनी मेहनत घेत मुलांकडून वेगवेगळे डान्स सादरीकरण केले तसेच आंतरराष्ट्रीय पंच म्हणून नियुक्ती झालेले योग टीचर श्री कुणाल चव्हाण सर व त्याचे सहकारी यांनी मलखांब सादर केले.
यावेळी आलेल्या लोकांना व गोविदा पथकांना चहा नास्ता याची सोय होती यावेळी शहराध्यक्ष अनिकेत कानडे याच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील नामांकित व्यापारी , जेष्ठ नागरिक यांनी भाजपाने आयोजित केलेल्या दहिहंडी ला उपस्थित लावून सूंदर नियोजना बद्दल अभिनंदन केले .यावेळी भाजपाने लावलेली दहिहंडी चे बक्षीस सात थर लावून श्रीकृष्ण गोविदा पथकाने पटकावले.
यावेळी DJ च्या तालावर अनेक तरुण थिरकत होते तसेच लोकांना प्रश्न विचारून विजेत्यांना बक्षिस देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे भूषण काणे, आबा जोशी, संजय बुटाला, शरद सोहनी , सुहास सोहनि, अजय तोडकरी, स्वाती जोशी , मंगल सोहनी ,नितीन तलाठी, चेंतन्य तलाठी, रोहन राठोड,अविनाश माने,ओकार पाटणे, नागेश धाडवे,रुद्र काणे,यासह अनेक पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा :