मंदार आपटे: खेड शहरामध्ये पारंपरिक असा गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय पक्षांनी लाखोच्या दहीहंडी लावत आणि गोविंदा पथक यांना मानाची गदा मानाच्या भेटवस्तू देऊन प्रत्येक मंडळाचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनसेची 51000 ची दहीहंडी तर भाजपची 21 हजाराची, शिवसेनेची एक लाख 51 हजाराची, राष्ट्रवादी काँग्रेसची एक लाख पन्नास हजाराची दहीहंडी लावण्यात आली होती राष्ट्रवादीची दहीहंडी खामतळ येथे होती तर शिवसेनेची दहीहंडी तीन बत्ती नाका खेड येथे होती. तसेच यंदा पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी कडून भाजप कार्यालयाच्या समोर 21000 ची दहीहंडी लावण्यात आली होती. तसेच मनसेची दहीहंडी छत्रपती शिवाजी चौक येथे होती यावेळी खेडवासी यांनी दहीहंडी उत्सवाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला.शहरातील हनुमान मित्रमंडळ दुपारी ३.०० वाजता पारंपारिक वाद्य वाजवत प्रत्येक नाक्यावरची हंडी फोडत होते. मंडळातील कार्यकरते ५ ते ६ चे थर लावत सर्व शहरामध्ये फिरून हंड्या फोडत होते. सर्व बाळ-गोपाळ मंडळी सकाळी आपल्या गावामध्ये घरोघरी जाऊन दुध-दही मागत आपला उत्सव आनंदाने साजरा करत होत.
श्रीकृष्ण गोविंदा पथक तसेच खेमनाथ मित्र मंडळ ,क्षेत्रफळ ,मित्र मंडळ ,संत रोहिदास नगर मित्र मंडळ यांसह अनेक नामांकित अशी मंडळ आपापल्या परीने मनोरे रचत प्रेक्षकांचा उत्साह वाढवत होती यावेळी अनेक आयोजकांनी निरनिराळ्या कलाकारांना संधी दे वेगवेगळ्या पद्धतीचे नृत्याविष्कार प्रेक्षकांसाठी दाखवण्यात आले यावेळी मनसेच्या वतीने खेड श्री तसेच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ तसेच खेडवासी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मलखांब योगासने स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार यासह राष्ट्रवादीच्या वतीने शक्ती तुरांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व स्पर्धा घेण्यात आली यावेळी खेडवासी सर्व आयोजकांना उत्तम असा प्रतिसाद दिला होता गेले दोन वर्ष बंद असलेला हा सण यावर्षी मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला.
या निमित्ताने खेड बाजारपेठ ही फळांनी फुलांनी सजलेली दिसत होती. बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण भागातील नागरिक दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आले होते. खेड भाजपाच्या वतीने गोविंद पथकातील गोविंदाना व नागरिकांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या नेत्यांचे चित्र असलेले टीशर्ट वाटले होते. त्यामुळे खेड शहर दहीहंडीच्या उत्सवात नाहून निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. २ वर्षांनी हंडी फोडायला मिळाल्यामुळे प्रत्येक गोविंदा आनंदाने या उत्सवात सामील झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.
हे देखील वाचा :
Very nice 👌