खेड शहरांमध्ये आज सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती गणपतीचे विसर्जन वाजत गाजत करताना पाहायला मिळत होते. ठीक ठिकाणी चौका चौकात शुभेच्छांचे कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. घरगुती अनेक गणपती वाजत गाजत नाचत गुलालाची उधळण करत जगबुडी नदी, नारंगी नदी, सुसरी येथील नदी,भरणे नाका येथे चोरदा नदी, आदि ठिकाणी गणपतीचे विसर्जनासाठी लोक जमले होते.
आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप देत होते. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या या गजरात महिला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नाचत होते .यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती. तसेच अनेक मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांना मदत करताना दिसत होते. रात्री उशिरा मिरवणूक गाजत वाजत गणपती विसर्जन सुरू होते. फटाक्यांची आताच बाजी होत होती.
चौका चौकातून काही मंडळांकडून पुष्पवृष्टीही गणपतीवर होत होती शहरातील नारंगी नदीवर जगबुडी नदीवर प्रशासनाच्या माध्यमातून चोख व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जगबुडी नदीवर रेस्क्यूची टीम विसर्जनासाठी सज्ज होती.
हे देखील पहा :