खेडमध्ये पीएम किसान योजनेला ई केवायसी साठी वाढता प्रतिसाद तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी घेतला लाभ:
मंदार आपटे (खेड):
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निरंतर लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाची सलगईकरण करा तसेच योजनेने इ केवायसी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. खेड तालुक्यातील प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाची जोडणी करण्याचे काम खेड सेतू कार्यालय व खेड तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना ही केवायसी पूर्ण झाले असून काही शेतकऱ्यांचे अपूर्ण असलेले काम दिनांक सात तारखेपर्यंत पूर्णत्वास होईल कारण 3 सप्टेंबर 2022 ते दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी शासकीय स्थानिक सुट्टीच्या दिवशीही खेड तालुक्यातील ग्राहक सेवा केंद्र खेड सेतू कार्यालय अशा विविध ठिकाणी ई-केवायसी चे काम सुरू असल्याचे पहावयास मिळत होते.
स्वतः तहसीलदार प्राजक्ता घोरपडे तसेच मंडल अधिकारी संजय मदरे,मारुती अलमोड, महसूल विभागाचे अनेक तलाठी,कोतवाल, , यांसह अमित उपनेकर सेतू कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच खेड तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी काम करताना दिसत आहेत.
हे देखील पहा :