महाराष्ट्र राज्य कब्बड्डी संघ निवड झाल्याबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने कुमारी सिद्धी राजेंद्र चाळके सत्कार

खेड (मंदार आपटे) :
हरीयाणा येथे संपन्न झालेल्या ६९ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये खेड तालुक्यातील सुकिवली गावची कन्या व अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे, तालुका-खेड, जिल्हा – रत्नागिरी या संघाची आक्रमक रायडर,अष्टपैलू, गुणवान खेळाडू कु.सिद्धी राजेंद्र चाळके हिची निवड होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी कुणबी शिक्षण संस्था संचालक श्री.राजाभाऊ बैकर,ज्येष्ठ राष्ट्रीय पंच, मार्गदर्शक श्री.दादा बैकर, सिद्धीचे वडील श्री राजेंद्र चाळके, खेड तालुका कब्बड्डी असोसिएशन अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कब्बड्डी असोसिएशन उपाध्यक्ष श्री सतीश उर्फ पप्पुशेठ चिकणे सचिव श्री.रवींद्र बैकर, उपाध्यक्ष श्री.महेशराव भोसले, श्री.आनंद उर्फ भाई हंबीर, माजी अध्यक्ष श्री. शरद सुर्वे, कोषाध्यक्ष श्री.दाजी राजगुरू, सहसचिव श्री.शरद भोसले, कार्यकारणी सदस्य श्री. दिपक यादव, श्री.सु. रा.पवार, श्री.स्वप्निल शेठ सैतावडेकर श्री.अमोल दळवी श्री.सुभाष आंबेडे, श्री. तुषार सापटे, श्री.संतोष शिर्के, श्री शंकर पार्तेश्री.महेश मर्चंडे, श्री.संजय जाधव, श्री सुजित भागे श्री मधुकर शिंदे सौ.संपदा गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील पहा👇👇 :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!