मंदार आपटे खेड:
खेड तालुक्यातील किल्ले रसाळगडसाठी १४ कोटी ९१ लाख ४१ हजार ९४० रुपये अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.त्यामुळे या गढाचा लवकरच कायापालट होणार आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर शिव छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारा हा गड कोकणच्या नकाश्यावर अग्रेसर आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकर्सना नवे डेस्टीनेशन आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट असून याच मार्गावरून जाताना पावसाळ्यामध्ये फार परिश्रम घ्यावे लागतात.काही ठिकाणी किल्ल्याची पडझड झाली आहे.
या गडाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला निधी समजल्याने तालुक्यातून अनेकांनी आनंद व्यक्त केला. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. दाट धुके हिरवळ , लांबच लांब सह्याद्रीच्या रांगा, पश्चिमेकडे पालगड दक्षिणेकडे असलेले जगबुडी नदीचे खोरे, मधु मकरंद गड असा परिसर या गडावरून दिसतो.
हे सगळे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पुणा- मुंबई या सारख्या ठिकाणावरील पर्यटकांची मोठी गर्दी होते. तसेच याच गडावर गावडेची एक मंदिर आहे. तेथे त्रैवार्षिक जत्रा देखील भरते यासाठी सर्व ग्रामस्त एकत्र येतात. पावसाळ्यामध्ये या गडावरती निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक लोक तेथे येतात.
रसाळगडाला भरगोस असा निधी प्राप्त झाल्याचे संबंधित पुरातन विभागाकडून कळविण्यात आले असून लवकरच या गडाचा कायापालट होणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हे देखील पहा 👇👇 :