खेड-(मंदार आपटे)
खेड मध्ये गुढीपाडवा पासून 10दिवस खेड लक्ष्मी नारायण मंदिर येथे रामनवमी उत्सव चालू आहे यावेळी रोज रात्री 10वाजता तरुण कीर्तनकार डोंबिवली येथील- मोहक प्रदीप रायकर,हे कीर्तन सेवा करीत आहे. यांचे लौकिक शिक्षण -BMS in Finance मधून असून कीर्तनातील शिक्षण – कीर्तन विशारद आहेत ते गेले 10 वर्ष नारदीय कीर्तनकार म्हणून कार्यरत आहे. वयाच्या 13 व्या वर्षी पहिले कीर्तन त्यांनी केले व तेव्हा पासून त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली आहे त्यांचे
कीर्तनातील गुरु – ह.भ.प.सुहासबुवा सरपोतदार, डोंबिवली व ह.भ.प.श्री.मोहनबुवा कुबेर,नागपूर हे आहेत तसेच सर्व कीर्तनकार हे माझे गुरुच आहेत.
असे ते नम्र पणे सांगतात. ज्यांच्याकड़ून शिकता आले ते प्रामाणिकपणे शिकण्याचा मी प्रयत्न करतोय असे ते म्हणतात. त्याच्या याच स्वभावामुळे त्यांचे अनेक जण कौतुक करतात.
त्यांनी संगीताचे शिक्षण – पं.सौ.मधुवंती फड़के,डोंबिवली.यांच्या कडून घेतले
आहे मोहक बुवा यांना
गेल्या 10 वर्षात – मुंबई विभाग, गिरगाव , कल्याण,विरार,वसई, कराड ,पनवेल, महाड, रत्नागिरी,श्रीक्षेत्र गणपतिपुळे राजापूर , लांजा, पाली, तारळ,कणकवली, कुडाळ, श्रीक्षेत्र गोंदवले, नागपूर, गोवा, मध्यप्रदेश(इंदौर) गुजरात(भिलाड) येथे कीर्तने झाली आहेत.ही सेवा करत असताना त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत त्यांना ब्राम्हण सेवा मंडळ , दादर ह्यांच्या 2014 रोजी झालेल्या भव्य कीर्तन स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे तर सेवा ब्राम्हण संस्था,विलेपार्ले मुंबई ह्यांच्या मार्फत 2015 रोजी झालेल्या कीर्तन स्पर्धे मध्ये ही त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तसेच त्यांना मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यानाश्री.ब्रामण सेवा संघ गिरगाव मुंबई ह्यांच्यकड़ून कीर्तन क्षेत्रातला विद्यानंद पुरस्कार प्राप्त झाला आहे. नारदीय कीर्तन परंपरा अशीच चालू ठेवणे हाच प्रामाणिक उद्देश माझा आहे असे ते सांगतात. त्याचे कीर्तन ऐकण्यासाठी खेड तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणत गर्दी करतात
हे देखील पहा 👇👇: